माझ्या किंवा कदाचित आमच्या सर्वांच्या बोटचेपेपणाच्या वृत्तीचा ‘आतला’ उद्रेक म्हणजे निखिल. ‘आतला’ विखार म्हणजे निखिल…
निखिल माझा नि कदाचित आमच्या सर्वांचा ‘आतला’ आवाज आहे. मला वाटते, ते तो बोलतो. मी विचार करतो किंवा करावा असे मला वाटते, ते तो विचार करून सांगतो. मला जे घडावे असे वाटते, ते तो चर्चेतून सांगू पाहतो. मला भांडावे, वाद घालावा, अगदी सळो की पळो करून सोडावे, आक्रमक व्हावे, आवाज लावावा इत्यादी इत्यादी वाटत असते. पण मी जे करत नाही, ते निखिल करू शकतो.......